डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती Abdul Kalam Information In Marathi

Abdul Kalam Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो ज्या महान व्यक्तिमत्वाला आपण “मिसाईल मॅन” व भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून ओळखतो  ते दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम होय. डॉक्टर कलाम यांनी अभियंता, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, राजकारणी, शिक्षक अशा अनेक भूमिका यशस्वीरित्या आपल्या आयुष्यात पार पाडले आहेत.

Abdul Kalam Information In Marathi
Abdul Kalam Information In Marathi

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती Abdul Kalam Information In Marathi

 त्यांनी त्यांच्या आयुष्याचा सर्वाधिक काळ शास्त्रज्ञ व विज्ञान प्रशासक म्हणून घालवलेला आहे.

पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म 15 ऑक्टोबर 1931
जन्मस्थान रामेश्वरम , तामीळनाडू
मृत्यू 27 जुलै 2015
राष्ट्रीयत्व भारतीय
राष्ट्रपती 25 जुलै 2002 – 25 जुलै 2007
व्यवसाय एरोस्पेस अभियंता, एरोस्पेस शास्त्रज्ञ, लेखक
पुस्तकेइग्नायटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया, विंग्ज ऑफ फायर
पुरस्कार पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्‍न
प्रसिद्ध नाव मिसाईल मॅन

 त्यांनी मुख्यत्वे करून संरक्षण संशोधन विकास संस्था DRDO  आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO व भारताचा नागरी अंतराळ कार्यक्रम व लष्करी क्षेपणास्त्राच्या विकास कामांमध्ये आपला जास्त काळ व्यतीत केलेला आहे .

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र व प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकास कामांमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जाते.

 कलामांनी 1998 रोजी पोखरण 2 या भारताच्या आण्विक चाचण्यांमध्ये देखील खूप मोलाची संघटनात्मक तांत्रिक व राजकीय भूमिका बजावल्याचे पाहण्यास मिळते.

डॉ.अब्दुल कलाम यांची प्राथमिक माहिती:-

कलामांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते. पण सर्वजण त्यांना अब्दुल कलाम याच नावाने ओळखत असे. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडूमधील रामेश्वरम येथे एका छोट्याशा गावात झाला होता, त्यांच्या वडिलांचे नाव जैनुद्दीन असे होते व त्यांच्या आईचे नाव अशी अम्मा असे होते .अब्दुल कलामांना एकूण चार भावंडे होती तसेच एक बहिण देखील होती.

डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रारंभिक जीवन:-

डॉक्टर अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण हे रामेश्वरम या गावात असलेल्या सरकारी शाळेतच पूर्ण झाले, त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणाचा निर्णय घेतला व रामनाथपुरम येथील हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयात कलामांनी बीएससी या कोर्स साठी प्रवेश निश्चित केला.

पण बीएससी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना असे वाटले की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला रुची आहे त्या क्षेत्रात पुढे आपले करिअर घडवण्यास बीएससी हा कोर्स आपल्यासाठी काही उपयुक्त नाही, त्यामुळे त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला व त्यांनी मद्रास टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश निश्चिती करून आपले अभियांत्रिकीचे देखील शिक्षण पूर्ण केले.

कलाम हे अगदी अति सामान्य घरातील असल्यामुळे त्यांना देखील गरिबीचे चटके लहानपणापासूनच सोसावे लागत होते. त्यांचा परिवार मोठा असल्याकारणाने खाण्यापिण्याचे व मूलभूत गरजा भागवण्याचेच त्यांचे हाल व्हायचे. अशा परिस्थितीत देखील अब्दुल कलामांनी आपले शिक्षण चालूच ठेवले. अब्दुल कलाम जेव्हा शाळेत जायचे तेव्हा पत्र वाटपाची काम करून त्यांनी पैसे कमावले व स्वतःची शाळेची फी त्यांनी स्वतः भरली.

मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत असताना अवकाश संशोधन अर्थातच एरोनॉटिक्स या विषयांमध्ये त्यांनी आपला डिप्लोमा पूर्ण केला ही पदवी मिळाल्यानंतर भारतीय एरोनॉटिक्स लिमिटेड बेंगलोर येथे त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. तिथे त्यांना अनेक नव्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. हे काम करत असताना विमानाच्या इंजिनची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

कार्यरत असताना त्यांनी दोन प्रकारच्या इंजिनचा अभ्यास केला एक पिस्टन व दुसरे टर्बाईन. एरोनॉटिक्स या विषयांमध्ये आणखी अभ्यास करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी अमेरिकेमधील नासा या संशोधन संस्थेमध्ये एरोस्पेस टेक्नॉलॉजी या विषयावर तब्बल चार ते पाच महिने अभ्यास करून बरेचसे ज्ञान पदरी पाडून घेतलं.

1958 ते 1963 रोजी संरक्षण संशोधन व विकास संस्था येथे अब्दुल कलामांचे प्रशिक्षण चालू झाले. शिक्षण घेत असतानाच सर्वसामान्य घरातील हा एक मुलगा भारताचा एक सुप्रसिद्ध व महान वैज्ञानिक म्हणून ओळखला जाऊ लागला. कलामांचे वैयक्तिक आयुष्य यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास हा काही सोपा नव्हता.

वैज्ञानिक होण्यापर्यंत त्यांना अत्यंत कष्टदायी व कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यांचे वडील हे एक नौका व्यावसायिक होते. त्यांच्या घरामध्ये एक वेळ खाण्याची देखील हाल होते.

अब्दुल कलाम यांनी आपल्या शिक्षणासाठी अनेक कामे देखील केली होती. जसे की पेपर वाटणे ,पत्र वाटप करणे ,इत्यादी… इतकेच नव्हे तर आपल्या शिक्षणासाठी आपल्या बहिणीचे दागिने देखील त्यांना घाण ठेवावे लागले होते. कष्टाचे चटके सोसत असताना त्यांनी एक दिवस स्वतःला सिद्ध करून दाखवले.

व या अपार मेहनतीच्या जोरावर ते एक महान वैज्ञानिक झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची कामगिरी पाहून भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कलाम हे अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे व्यक्ति होते त्यामुळे ते नेहमी आपल्या करिअर कडे लक्ष देत गेले. वैयक्तिक आयुष्याकडे त्यांनी कधीच इतक्या बारकाईने लक्ष दिले नाही. त्यामुळे कलाम हे अविवाहितच राहिले.

डॉ.अब्दुल कलाम यांची वैद्यकीय क्षेत्रात वाटचाल:-

वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे राजकीय क्षेत्रातील दरवाजे कलामांसाठी खुले झाले. कलाम हे इस्त्रोचे वैज्ञानिक म्हणून बराच काळ कार्यरत असताना, संरक्षण संशोधन व विकास संस्थांमध्ये कार्यरत असताना त्यांनी हेलिकॉप्टर चे डिझाईन देखील तयार केले होते. व पुढे जाऊन ते इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च चे सदस्य देखील बनले.

वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या आयुष्यातील खरी सुरुवात म्हणजे 1963 रोजी जेव्हा कलाम भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये पीएसएलव्ही या क्षेपणास्त्र विकासासाठी काम करत होते. विज्ञान व तंत्रज्ञान यामध्ये आवड व त्यांचा दांडगा अनुभव यावेळी  त्यांना कामी आला .

खूप संशोधनात्मक अभ्यास करून त्यांनी अग्नी व पृथ्वी अशा दोन क्षेपणास्त्राची निर्मिती करून त्यांचे यशस्वीरित्या उड्डाण देखील करून दाखवले .यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातच कलामांचे कौतुक झाले.

या कार्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अतिउच्च शिखरावर कलाम पोहोचले होते. या संशोधनामुळे त्यांना मिसाईल मॅन ही पदवी देण्यात आली. भारताच्या पंतप्रधानांनी त्यावेळी त्यांची भारताचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील निवड केली.

 भारताचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्यरत असताना त्यांनी नेहमी पुढील दहा वर्षांमध्ये भारत कसा असला पाहिजे किंवा भारताने कशी प्रगती केली पाहिजे याबद्दल वेगवेगळे प्रकल्प राबवले व अनेक धोरणे देखील मार्गी लावली.

1958 रोजी कलाम यांना संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे सीनियर सायंटिस्ट या पदी बसविण्यात आले. हैदराबाद येथील डीआरडीओ मध्ये संचालक पद त्यांच्याकडे होतं. 1962 रोजी बेंगलोर येथे झालेल्या भारतीय अवकाश कार्यक्रमांमध्ये कलाम यांनी आपला सहभाग नोंदवला होता.

कलाम यांनी तेथे एक प्रकल्प हाती घेतला होता तो म्हणजे एरो डायनामिक्स डिझाईन फायबर रियन फोर्सड प्लास्टिक. त्यानंतर 1963 ते 1971 या कालावधी दरम्यान विक्रम साराभाई यांच्या समवेत तिरुवनंतपुरम येथे विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर येथे कलाम कार्यरत होते.तेथील सॅटॅलाइट लॉन्च वेहिकल प्रोग्राम चे प्रमुख म्हणून कलाम कार्यरत होते.

1979 रोजी एसएलव्ही या क्षेपणास्त्राच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक पद देखील कलाम यांनी भूषवले होते. ज्यावेळी अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला गेला म्हणजेच जुलै 1980 रोजी यावेळी कलाम हे तुंबा येथे एसएलव्ही 3 या प्रोजेक्टचे डायरेक्टर देखील होते. 1981 रोजी वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची कामगिरी पाहू त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. अब्दुल कलाम यांची राजकीय वाटचाल:-

भारत सरकारने त्यांची वैद्यकीय व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. सन 2001 रोजी कलाम यांनी वैद्यकीय व तंत्रज्ञान क्षेत्रामधून आपली निवृत्तीची घोषणा केली व त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात येण्यामागे त्यांचा काहीही वैयक्तिक स्वार्थ नव्हता परंतु राजकारणात आल्यावर देखील उत्तम कार्य त्यांनी पार पाडले.

2002 सालच्या निवडणुकीमध्ये कलाम राष्ट्रपती म्हणून निवडून आले व 9 लाख 22 हजार 784 मतांनी कलामांनी विजय मिळवला. व ते राष्ट्रपती पदावर विराजमान झाले .राष्ट्रपती भवनामध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे ते पहिले शास्त्रज्ञ होऊन गेले. राजकारणाचा त्यांच्या मागे काहीच अनुभव नव्हता. थेट वैद्यकीय क्षेत्रामधून राजकारणात येणे हे काही सोपे काम नव्हते.

25 जुलै 2002 रोजी अशोका हॉल येथे कलामांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली व भारताचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ओळखले जाऊ लागले. आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करत म्हणजेच पाच वर्ष त्यांनी राष्ट्रपती म्हणून कार्य केले या काळात लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. त्यावेळी त्यांचे कार्य पाहून त्यांच्या कामाची लोक पत्र पाठवून दाद देत असे.

कलाम हे सामान्य जनतेला देखील स्वतःहून भेटायला जात असे. राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर कधीही त्यांना त्याचा गर्व झाला नाही. राष्ट्रपती पदावर असताना त्यांना पीपल्स प्रेसिडेंट या नावाने देखील जनतेकडून संबोधले जात होते. राजकारणातून निवृत्त झाल्यावर कलाम हे लेखन व समाजकार्य करू लागले.कलामांनी आपल्या कार्यकाळात लेखन देखील केले आता आपण अब्दुल कलाम यांनी लिहिलेली काही पुस्तके देखील पाहुयात-

वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांनी खूप चांगले लेखन देखील केलेले होते. बहुतांश त्यांच्या पुस्तकांमध्ये भारत देशातील विकास यावर त्यांनी विशेष लेखन केलेले पाहावयास मिळते.

अदम्य जिद्द ,इग्नायटेड माईंड अनलिशिंग द पावर विदिन इंडिया या दोन्ही पुस्तकांचे मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहेत.त्याच बरोबर कलामांनी खालील पुस्तके देखील लिहीली.

इंडिया माय ड्रीम, इंडिया 20-20 ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम, एव्हीजिनिंग अँड एम्पावर्ड नेशन फॉर सोसायटील इन्फॉर्मेशन, विंग्स ऑफ फायर ,सायंटिस्ट टू प्रेसिडेंट ,टर्निंग पॉईंट्स, टार्गेट 3 मिलियन, ट्रान्सेनडस माय स्पिरिच्युअल एक्सपिरीयन्सेस विथ प्रमुख स्वामीजी, दीपस्तंभ,

अमॅनिफेसटो फॉर चेंज, ए व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया असे काही पुस्तके कलामांनी लिहिलेली आहेत. या पुस्तकांमधून जगभरातील विविध गोष्टींचे ज्ञान अतोनात भरलेले आहे. यातील एकूण एक पुस्तक हे काही ना काही तरी शिकवण देऊनच जाते.

डॉ. अब्दुल कलाम यांचा मृत्यू:-

एपीजे अब्दुल कलाम यांनी 27 जुलै 2015 रोजी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी संध्याकाळच्या सुमारास कलाम एका व्याख्यानासाठी गेले असता ते व्याख्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शिलॉंग मॅनेजमेंट येथे आयोजित केले होते. पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह कसा तयार करावा या विषयावर हा कार्यक्रम चालू असताना त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागलं व तितक्यातच हृदयविकाराचा तीव्र झटका त्यांना आला.

कलाम तिथेच बेशुद्ध पडले व आजूबाजूला असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले आयसीयू मध्ये काही काळ ठेवल्यानंतर दोन तासानंतर कलामांनी अखेरचा श्वास घेतला. कलामांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी रामेश्वरम येथेच करण्यात आले.

कलाम हे इतके लोकप्रिय व जनमानसात आवडीचे होते की रामेश्वरम येथे बस स्थानकावरच त्यांचे पार्थिव शरीर सामान्य लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. भारताच्या प्रगतीमध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा होता. अशा या महान व्यक्तिमत्वाला जग नेहमीच स्मरणात ठेवेल. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये कळवा…

 धन्यवाद!!!!

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:-

डॉ.अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय होते?

अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम

अब्दुल कलाम यांचे जन्मगाव कोणते?

रामेश्वरम

डॉ.अब्दुल कलाम यांची जन्मतारीख किती आहे?

15 ऑक्टोबर 1931

डॉ.अब्दुल कलाम यांचा मृत्यू कुठे झाला?

शिलॉंग येथे

Leave a Comment