BHMS कोर्स ची संपूर्ण माहिती BHMS Course Information In Marathi

BHMS Course Information In Marathi मित्रांनो नमस्कार, दहावी व बारावी झाल्यानंतरचा हा क्षण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याच्या भविष्यासाठी एक टर्निंग पॉईंट असतो. बऱ्याच मुलांनी आपल्याला भविष्यात काय करायचे हे आहे हे ठरवून ठेवलेले असते .प्रत्येक जण हा आपल्या पसंतीनुसार अभ्यासक्रम निवडत असतो.

BHMS Course Information In Marathi

BHMS कोर्स ची संपूर्ण माहिती BHMS Course Information In Marathi

कोण इंजीनियरिंग क्षेत्राकडे जाण्यास पसंती देतात. तर कोणी वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे जाण्यास पसंती देतात. तर कोणी बीएससी ऍग्री कडे जाण्यास पसंती दर्शवत असतात. बऱ्याच मुलांचे स्वप्न हे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर ही पदवी संपादन करणे हे असते. परंतु एमबीबीएस या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक मुलगा उतरू शकतो असे नाही. कारण कोणी कोणी आपल्या परिस्थितीनुसार या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकत नाही. कारण एमबीबीएस या अभ्यासक्रमाचा खर्च भरपूर असतो .

तसेच काही मुलांना NEET या परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे एमबीबीएस या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकत नाही. अशी अनेक कारणे असतात की, ज्यामुळे आपण एमबीबीएसला ऍडमिशन घेऊ शकत नाही. परंतु तुम्हाला तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी BAMS,BDS व BHMS  यांसारख्या पदव्या देखील असतात. म्हणजेच आपण हे तीनही अभ्यासक्रम पूर्ण करून डिग्री घेतल्यानंतर आपण आपल्याला डॉक्टर ही पदवी मिळवु शकतो.

चला तर मग आज आपण “BHMS”  या कोर्स विषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे.

या लेखात आपण BHMS म्हणजे काय? BHMS याचा फुल्ल फॉर्म काय? BHMS साठी लागणारी पात्रता,  BHMSची प्रवेश प्रक्रिया, BHMS कोर्स चा कालावधी,  BHMS ला लागणारा खर्च, BHMS मधील नोकरीच्या संधी , BHMS केल्यानंतर पुढे काय? इत्यादी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

तसेच BHMS चा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “Bachelor of  Homeopathic Medicine and Surgery” असा होतो.तर

BHMS चा मराठी फुल फॉर्म हा “होमिओपॅथीक औषध आणि शस्त्रक्रिया पदविका” असा होतो.

होमिओपॅथी ही भारतातील तिसरी सर्वात मोठी वैद्यकीय सेवा मानली जाते. जी देशातील लक्षणीय लोकांना वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम करते. शरीराचा नैसर्गिक पद्धतीने बचाव करण्यासाठी होमिओपॅथी मदत करत असते. BHMS हा होमिओपॅथिक क्षेत्रातील एक डिग्री कोर्स आहे .तसेच हा एक पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे.

ज्याच्याकडे BHMS ही डिग्री असते. तो आपल्या नावासमोर डॉक्टर हे टायटल वापरू शकतो. हा अभ्यासक्रम मानवी शरीरातील नैसर्गिक उपचार प्रक्रियेशी संबंधित आहे. होमिओपॅथी त्याच्या उपचार प्रक्रियेसाठी प्राणी, वनस्पती, खनिज आणि कृत्रिम पदार्थांचा वापर करत असते .

जगभरात होमिओपॅथीचा अभ्यास केला जात असल्याने या क्षेत्रात संधी भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे BHMS याची व्याप्ती इतर वैद्यकीय पद्धतीपेक्षा नक्कीच जास्त आहे. दयाळू, सहानभूतीशील व एकण्याचे कौशल्य असलेल्या लोकांसाठी हा एक आदर्श अभ्यासक्रम आहे. MBBS हे ऍलोपॅथिक वैद्यकीय विज्ञानाशी संबंधित आहे. तर BAMS हा आयुर्वेदिक उपचार आहे. तर BHMS हे एक होमिओपॅथिक उपचार आहेत.

BHMS  साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे:-

BHMS हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. BHMS या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विज्ञान ही शाखा आवश्यक असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच कला व वाणिज्य शाखेचा विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेऊ शकत नाही. तसेच तुम्ही बारावी ही विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातून करणे आवश्यक आहे.

तसेच बारावी मध्ये तुम्हाला कमीत कमी 50 % गुण असणे आवश्यक आहे व अनुसूचित जाती जमातीसाठी कमीत कमी 45 % गुण असणे आवश्यक आहे. या कोर्ससाठी वयोमर्यादा सुद्धा ठरवलेली आहे. विद्यार्थ्यांचे वय हे कमीत कमी 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असणे आवश्यक आहे.

BHMS या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला NEET ही प्रवेश परीक्षा पास करणे व त्यात चांगले गुण प्राप्त करणे महत्त्वाचे असते. तरच आपल्याला या कोर्सला प्रवेश मिळतो.

BHMS या कोर्स साठी कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात त्या पुढील प्रमाणे:-

NEET–

ही प्रवेश परीक्षा राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाते. ही M.B.B.S, B.D.S आणि समकक्ष आयुष साठी प्रवेश परीक्षा आहे.

KEAM (केरळ अभियांत्रिकी आर्किटेक्चर मेडिकल)  केरळमधील विविध व्यावसायिक पदवींसाठी प्रवेश निकष निश्चित करण्यासाठी केरळ सरकारच्या प्रवेश परीक्षा आयुक्त कार्यालयाद्वारे केरळ अभियांत्रिकी आर्किटेक्चर मेडिकल आयोजित केले जाते.

PUCET (पंजाब युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट )

ही प्रवेश परीक्षा पंजाब सरकारद्वारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी घेतली जाते.

TS EAMCET (तेलंगणा राज्य अभियांत्रिकी कृषी आणि वैद्यकीय सामाईक प्रवेश परीक्षा)  विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश निश्चित केली जाते. तसेच तेलंगणा राज्य उच्च शिक्षण परिषद (TSCHE) साठी जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान  विद्यापीठ हैदराबाद (JNTUH) द्वारे आयोजित केलेली ही राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. जसे कृषी, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी.

BHMS हा कोर्स 5.5 वर्षाचा असतो. तर 4.5 वर्षे हे अभ्यासासाठी असतात. तर 1 वर्ष हे इंटरशिप साठी असते.

१ वर्षाची इंटर्नशिप करणे हे फार महत्वाचे आणि अनिवार्य झाले आहे. कारण इंटर्नशिप केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते तसेच त्याशिवाय तुम्हाला पदवी सुद्धा मिळत नाही.

इंटर्नशिप प्रोग्राममध्ये हॉस्पिटलमध्ये 6 महिने इन-हाउस ट्रेनिंग आणि 6 महिने होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये प्रोफेशनलसोबत असते. हा अभ्यासक्रम सेमिस्टर पॅटर्न असतो. प्रत्येक सेमिस्टरला परीक्षा होते. एका वर्षात 2 सेमिस्टर अशाप्रकारे तूम्हाला BHMS हा कोर्स पूर्ण करण्यासाठी नऊ सेमिस्टर पार कराव्या लागतात.

BHMS मध्ये असणारे काही महत्वाचे विषय:-

तसे BHMS मध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळे विषय शिकवले जातात. परंतु त्यापैकी आपण काही महत्वाचे विषय जाणून घेऊयात.

होमिओपॅथिक तत्त्वज्ञानाची तत्त्वे (Principles of Homoeopathic Philosophy)

शरीरशास्त्र (Anatomy)

ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन (Organon of Medicine)

भ्रूणविज्ञान (Embryology)

होमिओपॅथिक मटेरिया मेडिका (Homeopathic MateriaMedica)

होमिओथेरपी (Homeotherapeutic)

कम्युनिटी मेडिसिन (Community Medicine)

स्त्रीविज्ञान (Gynaecology)

हिस्टोलॉजी (Histology)

फॉरेन्सिक मेडिसिन (Forensic Medicine)

पहिल्या व दुसऱ्या वर्षात घेण्यात येणारा अभ्यासक्रम

ऑर्गनऑन ऑफ मेडिसिन आणि होमिओपॅथिक

तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी

विषाणूशास्त्र आणि पॅरासिटोलॉजी बॅक्टेरियोलॉजीसह तत्त्वे

बायोकेमिस्ट्री ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन आणि होमिओपॅथिक

तत्त्वज्ञानाच्या तत्त्वांसह शरीरविज्ञान शरीरशास्त्र,

हिस्टोलॉजी आणि भ्रूणविज्ञान

फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजी होमिओपॅथिक

मटेरिया मेडिका टॉक्सिकॉलॉजी होमिओपॅथिक

फार्मसी – मेडिसिन आणि होमिओ थेरपीटिक्सचा सराव –

तिसऱ्या व चौथ्या वर्षात घेतला जाणारा अभ्यासक्रम

प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन आणि होमिओ थेरपीटिक्स

रिपर्टरी ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन कम्युनिटी मेडिसिन ईएनटी,

नेत्ररोग, दंत आणि होमिओ थेरपीटिक्स

मायक्रोबायोलॉजीसह शस्त्रक्रिया भ्रूणविज्ञान

अभ्यासक्रमाचे पाचवे वर्ष

इंटर्नशिप –

बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (बीएचएमएस) स्पेशलायझेशन पुढील प्रमाणे:-

फार्मसी, बालरोग ,मानसोपचार, त्वचा विशेषज्ञ, वंध्यत्व विशेषज्ञ.

BHMS  हा कोर्स आपण सरकारी व खाजगी अशा दोन्ही कॉलेजमध्ये करू शकतो. सरकारी कॉलेजमध्ये यासाठी आपणास दरवर्षी 12000 ते 30000 एवढे शुल्क आकारावे लागते. तर सरकारी कॉलेज पेक्षा खाजगी कॉलेजला हे शुल्क जास्त असते ते म्हणजे खाजगी कॉलेजला आपल्याला या कोर्ससाठी 150000 ते 200000 पर्यंत दरवर्षी शुल्क आकारावे लागते.

BHMS केल्यानंतर खालील क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत:

सरकारी / प्राइवेट हॉस्पिटल्स

मेडिकल कॉलेजस

रिसर्च इंस्टिट्यूट

नर्सिंग होम

ट्रेनिंग इंस्टिट्यूट

कन्सलटंसिस

होम्योपैथिक मेडिसिन सेंटर 

चेरीटेबल इंस्टिट्यूसंस

लाइफ साइंस इंडस्ट्रीज

फार्मा इंडस्ट्रीज

हेल्थकेयर कम्युनिटी

डिस्पेंसरीस

तसेच आपण स्वतःचे क्लिनिक सुद्धा सुरू करू शकतो.

BHMS हा कोर्स केल्यानंतर आपण कोणत्या ठिकाणी काम करू शकतो:-

होमिओपॅथिक डॉक्टर

होमिओपॅथिक वैद्यकीय सल्लागार

होमिओपॅथिक प्राध्यापक किंवा व्याख्याता

होमिओपॅथी फार्मासिस्ट

हॉस्पिटल व्यवस्थापक

वैद्यकीय अधिकारी

संशोधक

BHMS हा कोर्स केल्यानंतर आपण पुढील शिक्षण  घेऊ शकता जसे की,

प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम सर्टिफिकेट

कोर्स इन इलेक्ट्रो होमिओपॅथी सर्टिफिकेट कोर्स इन

क्लिनिकल होमिओपॅथी सर्टिफिकेट कोर्स इन

होमिओपॅथिक मेडिसिनल सिस्टीम (CHMS)

सतत होमिओपॅथिक वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम सर्टिफिकेट

कोर्स इन होमिओपॅथी (C.Hom)

डिप्लोमा इन इलेक्ट्रो-होमिओपॅथी होमिओपॅथिक

वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम डिप्लोमा इन

होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी

होमिओपॅथी मध्ये एमडी बालरोगशास्त्रात एमडी

रिपर्टरीमध्ये एमडी

एंडोक्राइनोलॉजी मध्ये एमडी

मानसोपचार मध्ये एमडी

होमिओपॅथिक फार्मसीमध्ये एमडी

प्रॅक्टिस ऑफ मेडिसिनमध्ये एमडी

BMHS  हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला सरकारी क्षेत्रात पगार हा 25000 ते 35000 दरमहा असा पडतो. तर खाजगी क्षेत्रात तो दरमहा 20000 असा मिळतो.

  • भारतातील काही प्रमुख BHMS शीर्ष कॉलेज:-
  • श्रीमती. चंदाबेन मोहनभाई पटेल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ,मुंबई
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान ,नाशिक
  • भारती विद्यापिठ , पुणे
  • गुरु गोबिंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ , नवी दिल्ली
  • नेहरू होम्योपैथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ,नवी दिल्ली
  • बेक्सन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , ग्रेटर नोएडा
  • महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स , विजयनगरम
  • NTR आरोग्य विज्ञान विद्यापीठ,विजयवाडा
  • सरकारी वैद्यकीय महाविद्यालय / राजेंद्र रुग्णालय, पटियालासरकारी वैद्यकीय महाविद्यालय / राजेंद्र रुग्णालय, पटियाला
  • सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय , चंडीगढ़
  • महाराजा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, आंध्र प्रदेश
  • माधव विद्यापीठ , सिरोही
  • बाबा फरीद विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान , फरीडकोट
  • येनेपोया विद्यापीठ , मंगळूर
  • जनार्दन राय नगर राजस्थान विद्यापीठ,उदयपूर
  • श्री साईराम होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र , चेन्नई
  • वेंकटेश्वर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , चेन्नई
  • शासकीय होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय , बंगलोर
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी , कोलकाता
  • फादर मुलर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज , कर्नाटक

BHMS हा कोर्स किती वर्षाचा असतो?

BHMS हा कोर्से 5.5 वर्षाचा असतो.4.5 वर्ष हे अभ्यासाचे असतात.तर 1 वर्ष हे इंटरमिजिएट साठी असते.

BHMS मध्ये काय शिकवले जाते?

या कोर्समध्ये शरीराचा नैसर्गिक पद्धतीने बचाव करण्यासाठी होमिओपॅथी कशी मदत करते हे शिकवले जाते. या उपचार प्रक्रियेमध्ये प्राणी ,वनस्पती खनिजे आणि कृत्रिम पद्धतीचा कसा वापर केला जातो हे शिकवले जाते. हा अभ्यासक्रम मानवी शरीरातील नैसर्गिक उपचार प्रक्रियेशी संबंधित आहे.

MBBS, BAMS व BHMS यात काय फरक आहे?

MBBS हे ऍलोपॅथिक वैद्यकीय विज्ञानाशी संबंधित आहे. तर BAMS हे एक आयुर्वेदिक उपचार आहे. तर BHMS हे होमिओपॅथिक उपचार आहे.

Leave a Comment