प्रतापगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Pratapgad Fort Information In Marathi

Pratapgad Fort Information In Marathi नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण प्रतापगड या किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्र मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रतापगड या किल्ल्याला ‘शौर्य किल्ला’ म्हणून देखील ओळखले जाते, कारण या किल्ल्याची छत्रपती शिवाजी महाराज यांचा बराचसा इतिहास जोडलेला आहे.

Pratapgad Fort Information In Marathi
Pratapgad Fort Information In Marathi

प्रतापगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Pratapgad Fort Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखाण यांचात झालेल्या भेटीचे ते दृश्य आपल्या हृदयात साठवून आज देखील त्या सह्याद्री रंगांमध्ये दिमाखात उभा आहे. प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रतापगड हा गिरीदुर्ग प्रकारातील गड आहे व तो सह्याद्री रांगांमध्ये जावळीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या घनदाट जंगलामध्ये हा किल्ला बांधण्यात आला आहे.

किल्ल्याचे नाव प्रतापगड किल्ला
किल्ल्याची उंची 3556 फुट
किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग किल्ला
किल्ला चढाईची श्रेणी सोपी
किल्ल्याचे ठिकाण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव महाबळेश्वर
डोंगररांग सातारा
किल्ला कोणी बांधला मोरोपंत पिंगळे
कोणत्या साली बांधला1656
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची उंची17 फुट

समुद्रसपाटीपासून प्रतापगड हा किल्ला 1081मी च्या उंचीवर आहे व या गडाच्या दोन्ही बाजूंना दोनशे ते अडीचशे मीटर खोल दरी असल्याचे आपल्याला पाहतो.प्रतापगड हा किल्ला वाई जवळील असलेल्या जावळीच्या खोऱ्यामध्ये , महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर वसलेला आहे. व महाबळेश्वर पासून प्रतापगड हा किल्ला 22 की.मी च्या अंतरावर आहे.

प्रतापगड या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला 72 क्रमांकाचा राज्य महामार्ग घ्यावा लागतो. प्रतापगड हा किल्ला किनिश्वर व पार या दोन गावांमध्ये असलेल्या टेंबावर बांधण्यात आला आहे. व हा गड चढण्यासाठी फारसा अवघड नाही गडाच्या पायथ्यापर्यंत वाहने नेने सोपे आहे. व तुम्हाला जर गडावर पायी जायचे असेल तर कुंभऋषी गावातून पायवाट देखील उपलब्ध आहे. व या व्यतिरिक्त किल्ल्यावर जाण्यासाठी काही चोर वाटा देखील आहेत.

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास:-

जावळी खोरे हे स्वराज्यात आल्यानंतर महाराजांनी मोरे त्रंबक पिंगळे यांच्याकडून इ. स.1656 मध्ये हा गड बांधून घेतला होता. प्रतापगड या किल्ल्याचे मुख्य किल्ला आणि बालेकिल्ला असे दोन भाग पाडले जातात. या भागांमध्ये तलाव देखील आहेत व सुरक्षेच्या कारणास्तव गडाच्या चारही बाजूंना भक्कम तटबंदी तसेच बुरुज देखील घातलेले आहेत. प्रतापगड किल्ल्याच्या मुख्य किल्ल्याचे क्षेत्रफळ हे 3885 चौ.मी. एवढे आहे व बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ हे 3660 चौ.मी. इतके आहे.

किल्ल्याच्या दक्षिण दिशेकडचे बुरुज हे दहा ते पंधरा मीटर उंचीचे आहेत व या बुरुजांपैकीच रेडका, अफजल, केदार, राजपहार या सर्व बुरुजांचे अवशेष आजच्या काळात देखील टिकून असल्याचे दिसते. मुख्य किल्ल्यामध्ये तुळजाभवानीचे मंदिर आहे. 1661 मध्ये छत्रपती शिवरायांच्या आदेशानुसार मोरे त्रंबक पिंगळे यांच्याकडून हे मंदिर स्थापित करून घेण्यात आले होते.

गडामध्ये असलेले तुळजाभवानीचे मूळ मंदिर हे दगडी गाभाऱ्याचे आहे ,व या मंदिरासमोरच दोन उंच दगडी दीपमाळा देखील आहेत ,व याच्यात जवळ नगार खाण्याची पुरातन इमारत देखील आपल्याला पाहायला मिळते व 1935 ह्या साली ह्या इमारतिचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला. प्रतापगडावर छत्रपती शिवरायांनी स्वतः एक पुरातन शिवमंदिर देखील बांधून घेतलेले आपल्याला पाहायला मिळते.

किल्ल्याचे खूप काम चालू असतानाही शिवलिंग सापडल्याचे जुन्या इतिहासामध्ये सांगितले जाते व युद्धाला जाण्यापूर्वीच महाराजांनी या शिवलिंगाची स्थापना केलेली हे देखील आपल्याला कळते. आज देखील प्रत्येक मराठी माणसाला प्रतापगडाचे नाव उच्चारताना आठवते ती म्हणजे फक्त महाराजांची व अफजलखानाची झालेली ती एक ऐतिहासिक भेट.

आज प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्त्व देखील या घटनेमुळे वाढलेले आपल्याला कळते. ई. स.1659 ह्या साली झालेली ती भेट आज देखील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे. व याच भेटीदरम्यान मोठ्या चतुराईने, धाडसाने व शौर्याने महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. छत्रपती राजाराम महाराज यांनी देखील प्रतापगडाला भेट दिली होती जेव्हा ते जिंजीला जात होते.

1778 ह्या साली सखाराम बापू यांना नाना फडणीस यांनी प्रतापगडावर नजर कैदेत ठेवले होते व त्यानंतर 1796 साली जेव्हा नाना फडणीसांवर दौलतराव शिंदे आणि बाळोबा कुंजीर यांनी चाल केली होती त्यावेळी नाना प्रतापगडावर आश्रयासाठी थांबले होते. पुढे ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले व त्या युद्धामध्ये मराठ्यांचे बरेचसे नुकसान झाले व त्याचवेळेस ई.स.1818 मध्ये मराठ्यांना प्रतापगड हा किल्ला गमवावा लागला व त्यानंतर ब्रिटिशांनी प्रतापगडावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.

त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाच मीटर उंच असा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. व छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य पुतळ्याचे अनावरण तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नोव्हेंबर 1957 ह्या साली करण्यात आले. व ह्या येत्या काळामध्ये प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानने प्रशस्त असे एक सभागृह देखील उभारलेले आहे.

तसेच या गडावर तुळजाभवानीच्या मंदिरापासून थोड्याशा अंतराने आग्नेय दिशेला म्हणजेच अफजल बुरुजाच्या नजिकच अफजलखानाची कबर देखील आहे.व ह्या ठिकाणी दरवर्षी न चुकता उरूस भरवण्यात येतो. 1957 मध्ये कुंभराशी गावापासून ते प्रतापगडाच्या पायथ्याशी किंवा प्रवेशद्वारापर्यंत वाहनांसाठी रस्ता बनविण्यात आला व यामुळे प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत वाहने ने-आण करणे सोपे झाले. लांबून येणाऱ्या लोकांसाठी येथे एक धर्मशाळा देखील बांधण्यात आली.

प्रतापगड या किल्ल्याची तटबंदी आज देखील शाबूत तसेच मजबूत आहे. पावसाळ्यामध्ये प्रतापगडाचा संपूर्ण परिसर हा हिरवाईने नटलेला असतो. तसेच महाराजांच्या स्मारकाची जबाबदारी ही सातारा जिल्हा परिषदेवर आहे व येथील बागेच्या व इतर सर्व परिसर याची जबाबदारी ही वन विभागाची जबाबदारी असल्याचे कळते. प्रतापगडावर सूर्यदेव व सूर्यास्त याचा आनंद घेण्यासाठी बरेचसे पर्यटक येथे येत असतात.

प्रतापगडावर झालेला अफझलखानाचा वध:-

प्रतापगडावर झालेली छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्यामधील ही लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासामधील महत्त्वाची लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना टक्कर देण्यासाठी कोणाला पाठवायचे याचा विचार बडी बेगम करत होती व तीने महाराजांना टक्कर देण्यासाठी अफजलखानाला निवडले कारण की अफजलखान ई.स. 1649 मध्ये वाई प्रांताचा सुभेदार होता. म्हणूनच तो छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे टक्कर देऊ शकेल म्हणून त्याला पाठविण्यात आले.

वाई व स्वराज्य लागून व जवळ होते त्यामुळे अफजलखानाला स्वराज्यातील सर्व राजकारणाचा अंदाज होता व याचमुळे या प्रांतातील सर्व वतनदारांची आणि अफजलखानाची चांगलीच ओळख होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याची मोहीम ही अफजलखानाला देण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या सोबत काही सैनिक घेतलेले ज्यामध्ये सय्यद बंडा, यातुफा खान, फजल खान आणि अंबरखान हे यांच्यातले प्रमुख होते व मराठी सरदार प्रतापराव मोरे व पिलाजी मोहिते यांना देखील याच्यात समाविष्ट करून घेतले होते.  

प्रतापगडाकडे येताना वाटेत असलेली सर्व गावे तसेच मंदिरे तो उध्वस्त करून प्रतापगडाकडे सरसावत होता व हे सर्व उध्वस्त करून तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला व तेथेच ठाण मांडली होती. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला एक विश्वासू दूत त्याच्याकडे पाठवून त्याला असे भासवून दिले होते की आपण त्याला घाबरलो आहोत व त्याला असे दाखवून दिले होते की युद्ध करण्याऐवजी आपण समजून असे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला आपल्या खबरी मार्फत सांगितले होते.

यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी ही भेट निश्चित झाली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी या भेटीदरम्यान एक अट घातली होती जी म्हणजे तिथे फक्त दहा अंगरक्षक असतील व त्यामधील एकच शामीन्यात असेल. भेटीच्या दिवशी अफजलखान हा शामीन्यात छत्रपती शिवाजी महाराजां अगोदरच आला होता.छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक होते की अफजलखान आपल्या सोबत घात-पात करणारच म्हणून त्यांनी अंगारख्याच्या आतमध्ये चिलखत घातले होते . व छत्रपती शिवाजी महाराज शामिन्यात येताच अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन दिले व दगा केला.  

अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांची मान धरली व त्यांच्या पाठीमध्ये बीचव्याने वार केला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत घातल्यामुळे त्यांना काहीही झाली नाही आणि अफजलखानाने केलेला वार हा फुकट गेला. म्हणूनच अफजल खान गोंधळला तितक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघ नखे खानाच्या पोटामध्ये घुसवली आणि खाण्याच्या कोथळ्या बाहेर काढल्यात.

याचवेळेस अफजलखान दगा दगा म्हणून ओरडला आणि अंगरक्षकांना जागे केले. व याचबरोबर शामिन्यामध्ये असलेला सय्यद बंडाने छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला मात्र तिथे असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीव महाले यांनी तो वार स्वतःवर घेतला, आणि या सर्व गडबडीमध्ये अफजलखान तेथून पळ काढून निघाला व पालखीत स्वार झाला.

मात्र पालखी उचलणाऱ्या भोईचे पाय संभाजी काळजीने कापले. व यानंतर जखमी असलेल्या अफजलखानाला मारून त्याचे शीर हे धडा पासून वेगळे करण्यात आले व अशाप्रकारे अफजलखानाचा वध करण्यात आला.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:-

प्रतापगड किल्ला कोणी बांधला?

मोरोपंत त्रिंबक पिंगळे

प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

सातारा जिल्ला

प्रतापगड किल्ल्याची उंची किती आहे?

3556 फुट

प्रतापगडावर कोणाचा वध करण्यात आला होता?

अफझलखानाचा वध

Leave a Comment